Skip directly to content

‘माझे पुस्तक’

वाचन - लेखन हा औपचारिक शिक्षणाचा पाया पारंपरिक पध्दतीने शिकताना संपूर्ण वर्णमाला शिकून झाल्यावरच मुले अर्थपूर्ण वाचन करू शकतात. त्याऐवजी वाचन प्रक्रिया लवकर सुरू व्हावी व विविध भाषिक खेळांमधून मराठी भाषाशिक्षण अधिक रंजक व्हावे, या दृष्टीने तयार केलेली ‘माझे पुस्तक’ ही एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक मालिका.
 
‘माझे पुस्तक’ मध्ये
  • एकूण 8 पुस्तिका, पैकी 1 ते 4 या पुस्तिका इयत्ता पहिलीसाठी आणि 5 ते 8 या पुस्तिका इयत्ता दुसरीसाठी
  • इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हा संच तीन वर्षात विभागून वापरता येऊ शकेल.
  • आकर्षक मुखपृष्ठे व पुस्तक वापराविषयीची माहिती
  • ही पुस्तके कशी वापरतात, याचे सविस्तर विवेचन करणरी स्वतंत्र शिक्षक हस्तपुस्तिका
 
पुस्तकांची रचना व वैशिष्ट्ये 
  • देवनागरी लिपीतील वर्णमालेच्या क्रमापेक्षा वेगळे असे छोटे छोटे अक्षरगट
  • मुलांच्या वयोगटाला योग्य आणि अर्थपूर्ण व रंजक वाचन–पाठांचा समावेश
  • या वयातील भाषिक समृध्दीसाठी मोठ्या प्रमाणावर वैविध्यपूर्ण भाषिक उपक्रम व खेळ
  • अक्षरे, स्वरचिन्हे, जोडाक्षरे  आणि विरामचिन्हे यांच्या परिचयासाठी काही विशिष्ट पध्दतींचा वापर
  • प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमावर आधारित नमुना चाचणी व गुणदान कसे करावे, याची माहिती
  • इयत्त तिसरी व चौथीसाठीही अशा पुस्तिका प्रकाशित करण्याची योजना आहे.
 
संपर्क
 
EDUNOVA SOLUTIONS
फोन नं. 020-24332051
इमेल : edunovapune@gmail.com