23 डिसेंबर 2009
'बालभवन' या उपक्रमांतर्गत या वर्षी दाढरे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता सातवीच्या तीन विद्यार्थ्यांनी बालविज्ञान परिषदेसाठी 'उर्जा बचतीसाठी कार्यक्षम दिवे’ हा प्रकल्प सादर केला होता.
जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर होणार्या निवडफेर्या पार करून हा प्रकल्प आता २७ डिसेंबर २००९ मध्ये अहमदाबाद येथे होणार्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी निवडला गेला आहे. जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमांतील विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागांतील अडचणींवर मात करून मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.