क्वेस्टच्या क्रीडा शिबिरातील मुलांचे यश!
नंदुरबार जिल्ह्यात चालणार्या क्वेस्टच्या प्रकल्पाचा भाग म्हणून ‘पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ’ या संस्थेच्या चार शाळांमधील मुलांसाठी क्रीडा शिबिराचा उपक्रम दर महिन्याला राबवला जातो. एकूण 40 मुले यात सहभाग घेतात. धावणे, खो-खो अशा क्रीडाप्रकारांचे या शिबिरात प्रशिक्षण दिले जाते.
फेब्रुवारी महिन्यात नंदुरबारमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत तलावडीच्या शाळेतील तीन मुलींनी चांगले यश संपादन केले -
प्रथम क्रमांक: नीता काकड्या वळवी
द्वितीय क्रमांक: शिंदा काकड्या पराडके
तृतीय क्रमांक: जिजा काकड्या पराडके
तसेच फेब्रुबारी महिन्यात पनवेल येथे झालेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी या शिबिरात शिकणार्या चार मुलांची नाशिक विभागातून निवड करण्यात आली. त्यांची नावे अशी:
15 वर्षाच्या आतील मुलांचा गट:
साईसिंग काकड्या पराडके (तलावडी) आणि शांतिलाल बिज्या रहासे (कोचरा)
15 वर्षाच्या आतील मुलींचा गट:
नीता मोग्या वळवी, जिजा काकड्या पराडके (तलावडी)
या यशामध्ये तेथील शाळांचे क्रीडा शिक्षक, मुख्य प्रशिक्षक अमित अष्टेकर आणि कृष्णा बांगर (प्रसून स्पोर्ट क्लब, डोंबिवली), तसेच खो-खो प्रशिक्षक समीर मांजरेकर यांचे महत्वाचे योगदान आहे.
या सर्वांचेच हार्दिक अभिनंदन!!



