प्रारंभ
अनौपचारिक पद्धतीने शिक्षण-संवाद साधण्यासाठी काही शिक्षणतज्ज्ञ व संगणकर्मींनी महाराष्ट्रातील मुंबई शहरानजिक असलेल्या ठाणे जिल्ह्यात “ठाणे अभ्यास गटा”ची स्थापना केली. शिक्षण-क्षेत्रामधील विविध व्यावहारिक व सैद्धांतिक पद्धतींमध्ये असलेली दरी बुजवण्याचे उद्दिष्ट या गटाने आपल्या डोळ्यांसमोर ठेवले होते. काही वर्षांनंतर या अध्ययन संवादाची-व्याप्ती वाढवून त्याचे कृतिगटात रुपांतर करण्याची गरज त्यांना भासू लागली. त्यातूनच २००७ मध्ये Quality Education Support Trust (QUEST), क्वेस्ट ह्या कृतिसंशोधनातून शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाचे उद्दिष्ट असलेल्या संस्थेची स्थापना झाली.



