आमची उद्दिष्टे

  1. प्रत्येक व्यक्तिला गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे.
  2. शिक्षण हा आत्मभानाचा आनंददायी प्रवास आहे या तत्वाचा पुरस्कार करणे.
  3. विद्यार्थीकेंद्री प्रगत शिक्षण-पद्धतीच्या विस्तारीकरणासाठी प्रेरणादायी शिक्षणतज्ज्ञांना प्रोत्साहन देणे.
  4. ग्रामीण, आदिवासी आणि शहरी भागातील पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रतिकृती विकसित करणे.
  5. अध्यापनशास्त्रातील नवीनतम ज्ञान व घडामोडी अध्यापक व शिक्षणतज्ज्ञांपर्यंत पोचवणे.
  6. शिक्षण-क्षेत्रातील संशोधन उपक्रमांना चालना देणे व ते राबवण्यासाठी सहकार्य करणे.